शेवटी  कारंजातील किन्नर श्रावणी हिंगासपुरे आली धावून सरकार च्या मदतीला

शेवटी  कारंजातील किन्नर श्रावणी हिंगासपुरे आली धावून सरकार च्या मदतीला



श्रावणी कडून 16000 रुपयाची शासनाला मदत


कारंजा लाड ( कारंजा वृत्तकेसरी)दी 23 एप्रिल


      संपूर्ण जग कोरोना सारख्या विषाणू च्या विळख्यात अडकलेले आहे. त्यामुळे सगळे कडे लॉक डाऊन सुरू आहे. यात गोरगरीब सामान्य माणसावर उपासमारीचे वेळ येऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते कडून अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे. तर  या मध्ये किन्नर बांधव  का मागे राहतील कारंजा शहरातील रहिवासी असलेली किन्नर श्रावणी हिंगासपुरे हिने 11000 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी ला तर कारंजा शहर पोलीस स्टेशनला 5100 रुपये सहायता म्हणून कारंजा चे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे रोख स्वरूपात दिले.या प्रकारे शेवटी  कारंजातील किन्नर श्रावणी हिंगासपुरे आली धावून सरकार च्या मदतीला असे म्हणायला हरकत नाही