वाढदिवसाच्या निरर्थक खर्च टाळून गुलाबराव घाटे यांनी कोरोनाच्या संकट काळात गरजवंताच्या मदतीला दिला १० हजाराचा धनादेश
कारंजा ( अमित संगेवार )दि 30 एप्रिल
कोरोना संकटकाळात आज मानवते च्या दृष्टिकोनातून विविध दाते समोर येत आहेत कुणी अन्न छत्र म्हणून उभे होत आहेत तर कुणी आर्थिक छत्र उभे करीत आहेत पंचायत समिती मंगरुलपीर चे सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी गुलाबराव घाटे यांचा 29 एप्रिल रोजी 60 वा वाढदिवस सेवानिवृत्ती व वाढदिवस निमित्य मुलगा अंकुश घाटे यांनी छोटे खानी कार्यक्रमाचे गुलाबराव घाटे यांचे समोर संकल्पना मांडली परंतू श्री घाटे यानी मुलांची समजूत काढत कोरोना ग्रस्त गरजवंतांना मदत मिळावी या करिता मदत निधी देण्याचे ठरले त्या नुसार माजी गटशिक्षणाधिकारी गुलाबराव घाटे यांनी आपल्या जन्मदिवसा निमित्य कारंजा तालुक्या मधील अडचणीत सापडलेल्या गरीब गरजू नागरिकांना कोरोना मुळे आलेल्या संकटाशी लढण्यासाठी मदतीचा हात म्हणून 10,000₹ चा धनादेश श्री. धीरज मांजरे तहसीलदार कारंजा यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी त्यांचे चिरंजीव श्री अंकुश घाटे हे सोबत उपस्थित होते.
राष्ट्र संकटात असतांना मानवतेच्या दृष्टीकोनातून, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेली मदत ही लाख मोलाची असल्याने त्याचे सर्वत्र प्रशंसा होत आहे