कारंजा शहरातील गरजूनां जीवनावश्यक वस्तूचे वितरण सामाजिक समता प्रबोधन मंच व समाजक्रांती आघाडी चा उपक्रम,
दिनांक 10 ते 14 एप्रिल सतत पाच दिवसात 1175 किटचे वितरण,शहरातील 9 ते 10 नगरात वितरण,.
कारंजा (शहर प्रतिनिधी) 14 एप्रिल
- कोविड 19 मूळे लोकडाऊन सुरू आहे,त्यामुळे घरात असलेल्या गोरगरीब लोकांच्या मदती साठी अनेक सामाजिक संघटना पुढे येत आहेत. अशातच सामाजिक समता प्रबोधन मंच व समाजक्रांती आघाडी च्या वतीने दिनांक 10 ते 14 एप्रिल च्या दरम्यान 9 ते 10 नगरातील परिसरात 1175 कुटूंबियांना जीवनावश्यक असलेल्या किराणा किटचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घरी असलेल्या गोरगरीब गरजवंताना दोन घास गोड अन्न मिळावे म्हणून जीवनावश्यक किराणा किटचे वाटप 10 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत शहरातील गौतम नगर,रमाई परिसर,अशोक नगर,पंचशील नगर,राहुल नगर, महात्मा फुले नगर,रविदास नगर,राहुल नगर व मानोरा रोड येथील गरजवंत कुटूंबियांना सामाजिक समता प्रबोधन मंचचे समनवयक तथा समाजक्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या तर्फे वितरण करण्यात आले.
दिनांक 10 एप्रिल पासून 14 एप्रिल पर्यंत सकाळी 8 ते 10 या वेळात कारंज्याचे तहसीलदार यांची परवानगी घेऊन गरजूनां किराणा किटचे वितरण करण्यात आले.
सदर वितरण करतेवेळी सामाजिक समता प्रबोधन मंचचे प्रा.वासुदेव भगत,प्रविण कानकिरड,विजय वानखडे, विनायक पदमगिरवार,प्राचार्य दयावान गव्हाणे, किसनराव ताटके, ज्ञानेश्वर खंडारे,विजय भड,तोतराम राठोड, सुरेश सावळे,महादेव ठोबरे, सुमेध भगत,आकाश रोकडे, अजिंक्य मोहड,निलेश वासनिक,कैलास इंगोले,देबानंद बोनते, अरुण घोडसाळ,शिवा कांबळे,सोनबा शेंडे,कमलाबाई शेंडे,सम्राट शेंडे,यश ननांवरे,दादू बोरकर,कपिल पाटील, आकाश इंगळे,खेम राठोड,गजानन पंडीत,देवा पांडे आदींनी वेगवेगळ्या दिवशी सोसियल डिस्टनसिगचे तत्व पाळून, मास्क घालून सहकार्य केले. तसेच या वितरना दरम्यान उपस्थित कार्यकते लोकांना घरातच रहाण्याचे आवाहन करत होते.