*बाहेर जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासना तर्फे मार्गदर्शक सूचना*

 


 


बाहेर जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासना तर्फे मार्गदर्शक सूचना


कारंजा (जिमाक)दि 30 एप्रिल


      महाराष्ट्र शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी पत्र निर्गमित करुन बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यांत अडकलेल्या व्यक्तींना स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी अटी/शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.


१) तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात; त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी /तालुका प्रशासनाशी संपर्क साधा. 


२) ज्या जिल्ह्यात तुम्ही अडकले आहात; त्या जिल्हा प्रशासनाशी /तालुका प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईलं.


३) वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात ते जिल्हा प्रशासन तुमच्या स्वः जिल्ह्याच्या प्रशासनाशी संपर्क साधणार आहे. 


४) संपर्क झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात त्या जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाल प्रवास परवानगी विषयी कळविण्यात येईल. त्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल.
*(त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यात अडकला आहात, तेथील जिल्हा अथवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. स्वः जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधून परवानगी मिळणार नाही. केवळ तुमचा वेळ खर्च होईल.)*


५)  परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तेथील प्रशासनाच्या परवानगीशिवाय वाशिम जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.