‘लॉकडाऊन’मध्ये ३ मे पर्यंत वाढ, पंतप्रधानांची घोषणा
कारंजा : ( कारंजा वृत्तकेसरी ) दि १४
कोरोना महामारीला रोखण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) याची घोषणा केली. पंतप्रधांनी आज देशाला संबोधीत केले. यावेळी ते बोलत होते.
पीएम मोदी म्हणाले की, कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारत मजबूत आहे. प्रत्येक देशवासीय योद्ध्याप्रमाणे कोरोना महामारी विरोधात लढत आहे. कष्ट सहन करून देशाला वाचवण्यात नागरिक पुढाकार घेत आहेत. नागरिकांच्या त्यागाला माझा सलाम करतो. अनेकांना अनेक समस्या आहेत मात्र कोरोनापासून वाचवण्यासाठी सर्व देशवासीय एकत्र आले आहेत.
ते म्हणाले की, शक्तीशाली देशांमध्ये कोरोना विषाणूने कहर माजविला आहे. मात्र, भारताने वेळीच कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मोठी पावले उचलली. लॉकडाऊनसारखा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशवासीयांना त्रासाला सामोरे जावे लागले, पण कोरोनाविरुद्धच्या लढाईन हा एक महत्त्वाचा निर्णय होता. ज्यामुळे देशवासीयांनी यासाठी मोठा त्याग दिला दिला आहे. देश त्यांच्या त्यागाला कधीच विसरणार नाही.
सरकारकडून उद्या नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. जे प्रदेश २० एप्रिलपर्यंत कोरोनाला रोखतील तिथे नियम शिथील केले जातील. कोरोनावर मात करण्यासाठी सप्तपदीचे पालन करण्याचे आवाहन यावेळी पीएम मोदी यांनी केले