अल्प पगारात सुद्धा सामाजिक कार्यात स्वताला झोकुन घेणाऱ्या अवलिया रविन्द्र घाटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत देवून दाखविली मनाची श्रीमंती
मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती आणि मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा
कारंजा : ( संदीप क़ुर्हे )दि २२ एप्रिल
अल्प पगारात सुद्धा सामाजिक कार्यात स्वताला झोकुन घेणाऱ्या अवलिया रविन्द्र घाटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत देवून मनाची श्रीमंती दाखवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. कोरोना संकटकाळी तन मन आणि धनाने सुद्धा मदत करणारे रवी घाटे यांचे करावे तेवढे कोतुक कमीच आहे..अखंड सेवेचे व्रत घेतलेला हा माणूस खरा सेवाभावी म्हणावा लागेल..जनता कर्फ्यू पासून आपली अल्प पगाराची ( रवी घाटे हे HDFC बँकेत temporary security guard म्हणून सेवा देतात.)नोकरी सांभाळून या संकटकाळात पोलिस कर्मचाऱ्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि तहानलेल्यांना पाणी वाटत पूर्ण कारंजा शहरभर फिरून तहान भागवतात.गरजूना जेवण पॕकेट पोहचवतात.आणि मुक्या जनावराँची देखील सेवा करतात.आतापर्यंत बरेच वेळा त्यांनी स्व खर्चाने नाश्ता व फळ वाटप केले आहे.आज हया अवलिया रवींद्र च्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दिलदार सेवेकर्याने मुख्यमंत्री निधीत फूल नाही फुलाची पाकळी म्हणून एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य बजावत 1000 रुपये तहसिलदार यांच्या कडे चेक स्वरूपात सुपूर्द केले आहेत.अशा या अवलिया रविन्द्र घाटे च्या कार्याला कारंजेकर मनापासून सलाम करीत आहे