दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई - ( कारंजा वृत्तकेसरी ) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. दरम्यान, या पेपरबाबत शिक्षण खात्याने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. दहावीचा हा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. तसेच नववी आणि अकरावीचा पेपर होणार नाही. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात टाकन्यात आला होता