मजूर ,बेघर, विस्थापित कामगार,परप्रांतीय मजूर यांच्या करिता निवारागृह,भोजन व्यवस्था करने करीता स्थानिक महसूल प्रशासनाच्या मदतीच्या आवाहनाला कारंजातील माहेश्वरी समाज संघटनेची रु 50 हजाराची मदत
कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी ) दि 19 एप्रिल
राज्यामध्ये सुरु असलेल्या महाभयंकर अशा कोरोना साथ रोगाची लागन झाल्या नंतर त्यावर नियंत्रण करण्याकरिता राज्यभर लॉक डाउन घोषित करण्यात आले असताना अशा स्थितीत राज्यातील मजूर ,बेघर, विस्थापित कामगार,परप्रांतीय मजूर यांच्या करिता निवारागृह,भोजन व्यवस्था करने करीता स्थानिक महसूल प्रशासन तर्फे तहसीलदार धीरज मांजरे यानी विविध सामाजिक संस्था,संघटना,खाजगी संस्था,दानशूर व्यक्ति यांना कुणाला आर्थिक मदत किवा अन्न धान्य द्यायचे असेल अशांनी संपर्क साधुन मदत करन्याचे आवाहन केले होते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक माहेश्वरी समाज संघटन यांनी या अड़चनीत सापडलेल्या,गरीब ,निराधार,गरजुन्ना मोलाची मदत म्हणून 50,000 रु ची आर्थिक मदत देवून मानवतेच्या दृष्टिने सामाजिक बाधीलकी जोपासली असून महसूल प्रशासना ने माहेश्वरी समाज संघटने चे आभार मानले आहे. यावेळी माहेश्वरी समाज संघटने चे सर्वश्री शेखरजी बंग, अशोकजी इन्नानी,ललितजी चांडक,दिलीपजी गिल्डा,मनीषजी साबू,धीरज बंग,गोपाल इन्नानी,दिनेश मालानी,रूपेश बाहेती,रवी गिल्डा आदिनची उपस्थिती होती