दिव्यांगाना पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी 5 टक्के स्वनिधीतून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करन्याची होतेय दिव्यांगा मधून मागणी

   
कारंजा : दी ९एप्रिल 


       कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केलेली आहे. सदर संचारबंदीच्या काळामध्ये दिव्यांग व्यक्ति त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचित राहू नये तसेच प्रत्येक गरजू दिव्यांग व्यक्तिपर्यंत शासनामार्फत पुरविली जाणारी मदत पोहचली जावी, दिव्यांग व्यक्तिंना त्यांच्या शारिरीक संवेदनाक्षम आणि संवेदनशील मर्यादामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या दिव्यांगत्वानुसार विशिष्ट आवश्यकता, दिनचर्या समजून घेणे ही आवश्यक आहे. तसेच अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य आणि वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्यानुसार दिव्यांग व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूअभावी उपासमार होणार नाही व भूकबळी होणार नाही याकरीता पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या 5 टक्के निधीतून निराधार/ निराश्रित व दिव्यांग व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूसाठी विना अट निर्वाह भत्ता देणे व दिव्यांग व्यक्तिंच्या पालकांना जीवनावश्यक वस्तूसाठी सर्व सहाय्य देणे बाबत सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यांनी सूचित करावे  तथा कारंजा  नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ति व वयोवृध्द नागरिक यांना घरपोच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध् करुन देण्यासाठी प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशीही मागणी होत आहे