जिल्हा कोरोनामुक्त झाले म्हणून गर्दी करु नका कोणत्याही स्वयम सेवी संस्थेने रात्री बेरात्री महामार्गावर नागरिकांच्या मनात शंका उपस्थीत होतील असे मदत कार्य करू नये


महानगरातून आलेल्यांची माहिती प्रशासनास द्यावी; अन्यथा कडक कारवाई
तहसीलदार धीरज मांजरे यांचे नागरिकांना आवाहन
कारंजा (कारंजा वृत्तकेसरी ) दि.२६ -
वाशिम जिल्हा हे कोरोना मुक्त झाले आहे म्हणून नागरिकांनी जास्तच निश्चिंत होऊन गर्दी करु नये, असे आवाहन कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी नागरिकांना व स्वयंसेवी संस्थाना उद्देशून केलेल्या एका परिपत्रका द्वारे केले आहे. गर्दीमुळे संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो असेही ते म्हणाले.
दुकाने व प्रतिष्ठाणे उघडणेबाबतही अनेक नागरिक फोन द्वारे विचारणा तहसील मध्ये ये जा करीत असून अद्याप पर्यंत तरी राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी यांचे मार्फत असे कोणतेच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आता पर्यंत जी स्थिती आहे तीच कायम राहणार आहे.शिवाय कारंजा शहर हे कोरोना बाधित यवतमाळ, अमरावती,अकोला च्या मधोमध असल्याने कारंजा ला संसर्ग चा धोका निर्माण झाला आहे त्याचे गाम्भीर्य शहर वासियांनी ओळखून कार्य करावे असेही आवाहन केले आहे तसेच स्वयम सेवक मदती च्या नावाखाली रात्रि बेरात्री महमार्गावर फिरत असल्याचे निदर्शनात येत असून त्यांनी ते त्वरित बंद करण्याचे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यानी केले आहे
महानगरातून आलेल्यांची माहिती प्रशासनास द्यावी; अन्यथा कडक कारवाई
देशातील अनेक भागातून तसेच मुख्यत्वे मुंबई, पुणे व इतर महानगरातून काही नागरिक हे चोरट्या मार्गांनी शहरात व तालुक्यातील इतर गावांमध्ये येत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये कोणी कोरोनाने संसर्गीत असेल तर नक्कीच हे महागात पडू शकते व कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच याबाबत त्वरीत महसुल, पोलिस, नगर पालीका किंवा ग्राम पंचायत प्रशासनांस माहिती द्यावी जेणे करुन अशा लोकांची आरोग्य तपासरी करुन त्यांना १५ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवता येऊ शकेल तसेच काही त्रास असल्यास उपचारही केले जाणे शक्य होेईल असेही ते म्हणाले. तसेच आपले घरी महानगरातून आलेल्या कोणाची माहिती लपविण्यात आली व त्यामुळे जर कां संसर्ग वाढला तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ही तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिला आहे.