कोरोना पार्श्वभूमीवर नियम तोडणाऱ्यावर पोलिसांचा दणका ,एकूण 39000 हजार रु दंड वसुल
कारंजा :: ( कारंजा वृत्तकेसरी )दी 18 एप्रिल
मा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी साहेब,मा अप्पर पोलिस अधिक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा संजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी पो स्टे शहर कारंजा चे सर्व अधिकारी ,कर्मचारी, यांच्या मदतीने कारंजा शहरात कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण 102 नागरिकावर कलम 188,269,भादवी सह क 51(1) आपत्ति व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे कारवाही करुण मा कोर्ट कारंजा येथे दोषारोप सादर करुण दंड किवा दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कोठड़ी ची शिक्षा ठोठवल्याने त्यांच्या कडून 35000 रु दंड वसूल करण्यात आला. तसेच तोंडाला मास्क वा रुमाल न बांधल्याने ऐकून 70 लोकावर 200 रु प्रमाणे 14000 रु आतापर्यंत एकून 39000 रु आतापर्यंत वसूल करण्यात आल्याची माहिती कारंजा शहर पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांनी दिली आहे. तरी सर्वानी अती आवश्यक असल्यासच बाहेर निघावे अन्यथा घरीच राहावे विनाकरण बाहर निघुन कायदा हातात घेवू नये असे आवाहन पोलिस प्रशासन तर्फे करण्यात आले आहे