पालघर येथील संतांची निर्घृण हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन जमावा सह जवाबदार कर्मचार्यांवर 302 चे गुन्हे दाखल करण्याची कारंजा शहर भाजपा ची निवेदनाद्वारे मागणी
कारंजा: ( संदीप क़ुर्हे )दि 22 एप्रिल
पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहनचालक यांना हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली. यासंदर्भात समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलीसच ‘त्या’ वयोवृद्ध संतांना हिंसक जमावाकडे सोपवत असल्याचे आणि पोलिसांसमोरच त्यांची निर्घृण हत्या होत असल्याचे भीषण सत्य उघड झाले आहे. जनतेच्या सुरक्षेचे दायित्व असणारे पोलीसच हत्या करणार्यांना सहाय्य करत असतील, तर जनतेने कुणाच्या भरवशावर रहायचे? त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचार्यांसह अन्य आरोपींची उच्चस्तरीय चौकशी करून 302 अंतर्गत गुन्हे दाखल करुण कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहर भाजपा तर्फे शहरध्यक्ष ललीत चांडक यांनी २२ एप्रिल रोजी तहसीलदार कारंजा यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. यावेळी महेंद्र लोढाया, ललित तिवारी,तेजपाल भाटिया,शशीकांत वेरुळकर,जिग्नेश लोढाया,विजय पाटिल काळे,मोहन पंजवानी,ईश्वर डेडुले,मनोज शिवाल, संदीप गढ़वाले,संदीप काळे, राजेश रोडे,आदि उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानुसार सदर घटना दि. १६ रोजी घडली. त्याची व्हिडीओ क्लिप दि. १९ रोजी समाजमाध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली. आपल्या राज्यात साधूंची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने स्वतः या घटनेची राज्याला माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची खबरदारी घेणे अपेक्षित होते. केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शाह यांनी स्वतः चौकशी करेपर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवेपर्यंत मा.मुख्यमंत्र्या च्या या हत्याकांडावर पांघरूण घालण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो.
राज्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली,या घटनेची चौकशी करण्याचा पुनरुच्चार करत असल्याचे निवेदनातुन कळविले आहे.