<no title>महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कारंजा शाखेतर्फे जनता कर्फ्यू मध्ये कार्यरत पोलिस कर्मचारी सह इतर कर्मचारिणा चाहा नासत्याचे वाटप

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करण्यात आलेला जनता कर्फ्यु दरम्यान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व हिंदू एकता मित्र मंडळ यांच्याकडून कर्मचारी अधिकारी यांना नाष्टा व चहा
माननीय नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे जनता कर्फ्यू घोषित केलेला आहे. त्या दरम्यान सर्व जनतेला घराबाहेर न निघण्याचे आवाहन तसेच आपले दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या दरम्यान कर्तव्यावर असणारे  पोलीस कर्मचारी अधिकारी वर्ग नगरपालिका, महसूल विभाग, तसेच शासकीय विभागातील अन्य कर्मचारी वर्ग यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजा तसेच हिंदू एकता मित्र मंडळ कारंजा लाड च्या वतीने पोहे व चहा चे आयोजन करण्यात आले होते. व हा कर्फ्यू असाच सुरु राहाला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून कारंजा शहरात कर्तव्यावर असणारे सर्व शासकीय कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजा व हिंदू एकता मित्र मंडळ च्या वतीने नाश्ता जेवण चहा देण्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील फुलारी यांनी सांगितले.