कारंजा'- सद्या सगळ्या जगात कोरोना या विषाणू ने अक्षरशः थैमान घातले आहे मग आपला भारत देश यातून कसा संपूर्ण लॉक डाऊन आहे, महाराष्ट्रात ही भयभीत करणारी परिस्थिती आहे,
अश्या परिस्थितीत कारंजा शहरातील बऱ्याच डॉक्टर मंडळींनी आपले हॉस्पिटल, क्लिनिक बंद करून ठेवले आहे अपवाद म्हणून
कारंजा शहरातील 2 असे डॉक्टर आहे की त्यांनी आपल्या जीवाची काळजी न करता आपले दवाखाने अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
त्यातील एक आहेत डॉ अजयजी कांत व दुसरे डॉ राजेंद्रजी संपत त्याच्याशी संपर्क केला असता, त्यांना विचारले की आपण खूप रिस्क घेत आहेत तेव्हा डॉ अजयजी कांत व डॉ.राजेंद्रजी संपत म्हणाले की, आपले प्रशासन पहा, पोलीस यंत्रणा पहा, महसूल विभाग पहा, नगर परिषद पहा,सामाजिक संस्था हे सगळे 24 तास रस्त्यावर उतरून ,आपले कुटूंब सोडून काम करत आहे यांचे कार्य पाहता त्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे
कारंजा शहरात अनेक बड्या डॉक्टरानी घेतली कोरोनाची धास्ती पण.... दोन डॉक्टर अपवाद
• रामदास विट्ठलराव मिसाळ