कारंजा दि 30 मार्च 2020
राज्या मध्ये सुरु असलेल्या महाभयंकर अशा कोरोना संसर्गजन्य साथ रोगावर नियंत्रण करने करीता राज्यातील सम्पूर्ण जिल्हा मध्ये लॉक डाउन करण्यात आले आहे परिणामी जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू झालेला आहे त्या अनुसंघाने covid-19 विषाणु च्या प्रादुर्भाव लॉक डाउन कालावधीत बेघर,विस्थापित कामगार,पर राज्यातील अडकलेले कामगार, यांच्या साठी निवारागृह,अन्नधान्य,व भोजन व्यवस्था बाबत ज्या स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था सहकारी संथा दानशूर व्यक्ति ज्यांना कुणाला अन्न धान्य किवा निधी स्वरुपात मदत करायची असेल अशांनी तहसील कार्यालय कारंजा येथे श्री विनोद हरने नायब तहसीलदार मो न 94 20 11 71 52 यांचेशी संपर्क साधन्याचे आवाहन तहसीलदार श्री धीरज मांजरे यांनी केले आहे
दानशूर व्यक्तीनी अन्नधान्य निधी स्वरुपात मदत करण्याचे तहसीलदार कारंजा यांचे आवाहन