कारंजा 31 मार्च
.10,11,12 जानेवारी 2020 या दरम्यान रामटेक नागार्जून येथे घेण्यात आलेले राज्य पुरस्कार चाचणी परिक्षेत शोभनाताई चवरे विद्यालयातील वर्ग नववी चा विद्यार्थी साहिल गोपाल काकड हा एकमेव विद्यार्थी स्काउट राज्य पुरस्कार परिक्षेत उत्तीर्ण झाला असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
साहिल काकड आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष शशिकांतजी चवरे, मुख्याध्यापिका
निलीमा कडू , पंकज सोनोने, तसेच डीएसओ राजेश गावंडे, डीटीसी मूरलीधर जाधव,स्काउट मास्टर गोपाल काकड यांना देतो.त्याच्या यशाबद्द्ल विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.