मा. मृदुलाजी लाड, पोलिस उपअधिक्षक (गृह) वाशिम यांचे आदेश
कारंजा दि.३१ मार्च 20- आजच्या घडिला
संपूर्ण जग सोसत असलेल्या कोरोना च्या झळीमुळे संपूर्ण मनूष्य जातच त्रासली आहे. उद्या १ एप्रील रोजी बरेचशे लोक आपले मित्र परिवार, हितसंबंधी अथवा नातेवाईकांना एप्रील फुल करीत असतात, त्यात त्यांना वेगळा असा आनंद प्राप्त होतोे. परंतू आजच्या परिस्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचे कोणतेच मेसेज कोणीही टाकू नये अथवा सोशल मिडीयावर व्हायरल करु नये जेणेकरुन लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन वाशिम जिल्हा हद्दीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही व प्रशासनावर तान निर्माण होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे वाशिम जिल्हा पोलिस विभागाचे वतीने मा. मृदुलाजी लाड, पोलिस उपअधिक्षक (गृह) यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६८ नुसार नोटीस द्वारे जाहीर केले आहे.
नागरिकांच्या सुज्ञपणावर पोलिस प्रशासनाला विश्वास असून नागरिक असे करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तरीही अशा स्वरुपाचे मॅसेज एखाद्याकडून सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास मॅसेज व्हायरल करणारा व त्या ग्रुपचे ऍडमीन वर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६८ नुसार प्रतिबंध करण्यात येईल. तसेच असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.
तरी सर्व गृप ऍडमिन यांनी आत्ताच आपल्या ग्रुप मधील सदस्यांना ह्या बाबत सुचना द्याव्यात तसेच सेटींग मध्ये जाऊन फक्त ऍडमीन मॅसेच सेंड करेल असे सेटिंग करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक वाशिम यांचे वतीने मा. मृदुलाजी लाड, पोलिस उपअधिक्षक (गृह) यांनी केले