प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्रदान


प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्रदान


कारंजा - कारंजा तालुक्यात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी  कारंजा येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अविश पब्लिकेशन कोल्हापूर आणि ग्यालक्सी विमा  यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथील रियो रिसॉर्ट मध्ये दिनांक 06 फेब्रूवारी रोजी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल 5 ते 15 कोटी ठेवी या गटातून बँको ब्ल्यू रिबन हा पुरस्कार प्रदान  करण्यात आला. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री रामकांतजी खलप व अविश पब्लिकेशन कोल्हापूरचे संपादक अविनाश शिंत्रे हे मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार कारंजा येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक आशा कृष्णा राऊत आणि वरिष्ठ लिपिक दिपक ढोले यांनी स्विकारला. पुरस्कार स्वीकारते वेळी  प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आकाश कर्हे, संचालक आशिष बंड, कृष्णा राऊत,मेघन जुमळे,भास्कर ढोले उपस्थित होते. कारंजा येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेला हा पुरस्काराबद्ल प्राप्त झाल्याबद्दल अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.